काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी ऐवजी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला विरोध

Updated: Jun 7, 2019, 05:21 PM IST
काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी ऐवजी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या काँग्रेसच्या बैठकीत स्वबळाचा नारा देण्यात आलाय. विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी पक्षाची आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आळवण्यात आला आहे. आघाडी असतानाही मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला मदत करत नाहीत, अशी तक्रार पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. उलटपक्षी राष्ट्रवादी भाजपलाच मदत करत असल्याचा आरोपही झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली आहे. 

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठक बोलावली होती. काँग्रेसची आजपासून पुढील दोन दिवस राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासोबत आढावा बैठक होणार आहे. आज औरंगाबादेतील काँग्रेस पदाधिकाऱ्यां सोबत बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही मह्त्वाच्या निर्णय घेण्यात आले. 

या बैठकीत आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाबद्दलचा विरोधातील सुरु पाहायला मिळाला. तसेच विधानसभा निवडणूकीसाठी आघाडी झाली तरी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसला साहाय्य करत नाहीत. अशी खंत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.