मोठी घोषणा । मुंबईत गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार

ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्या मुंबईत गरिबांसाठी घरे उभारण्यात येणार आहेत.  

Updated: Feb 6, 2020, 07:37 PM IST
मोठी घोषणा । मुंबईत गरिबांसाठी घरांची निर्मिती, ठाण्यात गृहनिर्माण भवन उभारणार   title=

मुंबई : ठाण्यात गृहनिर्माण भवन बांधले जाणार आहे. त्याठिकाणी म्हाडा आणि एसआरएचे कार्यालय हे एकत्र असेल.  तसेच मुंबई गृहनिर्माण विकासाला चालना देण्यात येणार आहे. मुंबईत गरिबांसाठी घरे उभारण्यात येणार आहेत. यापुढे एसआरएमध्ये ३०० चौरस फूटाची सदनिका मिळणार आहे. तसेच  SRA च्या इमारतींचा दर्जा राखण्यासाठी गुणवत्ता कक्षाची निर्मिती करणार आहेत.  MMR क्षेत्रातील एकूण सात महापालिका आणि सात नगरपालिका क्षेत्रात SRA योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच  राहिल त्याच घर असे धोरण असेल.  झोपडपट्टीतील भाडेकरूना घरमालक जाहीर करून त्याला एसआरएमध्ये घर दिले जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड  यांनी दिली. 

 एसआरएमध्ये ३०० चौरस फूटाची सदनिका देण्यात येणार आहे.  बिल्डरांनी ३० दिवसांच्या आत प्रकल्पग्रस्तांची घरं सरकारला दिली पाहिजेत, नाही तर कारवाई होईल, असे संकेत आव्हाड यांनी यावेळी दिलेत. चेंबूर - गोवंडी जवळील माहुलची घरे पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री जाणार आहेत, तिथे प्रदूषण दूर करून घरं राहण्यायोग्य केली जातील, असे आश्वासन आव्हाड यांनी यावेळी दिले. 

SRA च्या इमारतींचा दर्जा राखण्यासाठी गुणवत्ता कक्षाची निर्मिती करणार आहोत.  MMR क्षेत्रातील एकूण १४ पालिका क्षेत्रात SRA योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  राहिल त्याच घर हे धोरण असणार आहे.  झोपडपट्टीतील भाडेकरूना घरमालक जाहीर करून त्याला एसआरएमध्ये घर दिले जाईल. अनेक जण इमारतीमध्ये रहायला जातात आणि झोपडी भाड्याने देतात, तिथला भाडेकरू कुठे जाईल, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली. 

मुंबईत गरिबांसाठी घरांची निर्मिती

मुंबईतल्या पुर्नविकासासाठी दुबईच्या कंपन्या येणार आहेत आहेत.  दुबईचे राजे मुंबईत आल्यावर त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चर्चा करतील.  गृहनिर्माणला चालना द्यायचा प्रयत्न करणार आहोत.  गरिबांना डोळ्यासमोर ठेवून घरांची निर्मिती करण्यावर आमच्या सरकारचा प्रयत्न असणार आहे.  एचपीसीएलजवळ पोलिसांना २२ हजार घरं द्यायचा प्रयत्न करु.  ठाण्यातही ९००० घरांपैकी १८०० घरं पोलीस आणि चतुश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.  SRA मध्ये ३३  निर्णय घेतले जे गृहनिर्माण क्षेत्रावर प्रभाव पाडू शकतील, गरिबांच्या कल्याणासाठी हे निर्णय आहेत,  असे जिंतेंद्र आव्हाड म्हणालेत. 

म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास 

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील अतिरिक्त बांधकाम क्षेत्रासाठी आकारण्यात येणार्‍या अधिमूल्याच्या दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  म्हाडाच्या वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्व परवानग्यांसाठी एक खिडकी योजना लागू करणार आहोत. झोपडपट्ट्यांचे ड्रोन सर्वेक्षण करणार आणि त्याच्या सीमा आखणार आहोत.  त्या पलिकडे झोपड्या झाल्या तर संबंधित विभागातील पोलीस आणि महापालिका अधिकारी यांना जबाबदार धरणार, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

 म्हाडा वसाहतींना क्लस्टर बंधनकारक

काँग्रेसने एसआरएमध्ये ५०० चौ. फूट घराचे आश्वासन दिलं आहे, सध्या आम्ही ३०० चौ. फूट घर देण्याचं ठरवले आहे. त्या आश्वासनाबाबत आम्ही आढावा घेतोय, मुंबईतील पायाभूत सुविधा आणि इतर बाबींचा अभ्यास करून समिती याबाबत ठरवेल. म्हाडाच्या वसाहतींचा क्लस्टर अंतर्गत विकास करणार आहोत. वसाहतीतील एका-एका इमारतीचा विकास होऊ देणार नाही. तर समूह विकास करण्यावर आमचा भर असेल. त्यामुळे सगळ्यांचा घरे मिळतील आणि कोणाचे नुकसान होणार नाही. म्हाडा वसाहतींना क्लस्टर राबवणे बंधनकारक केले जाणार असेही ते म्हणालेत.