मुंबईने चीनला टाकलं मागे, चीनपेक्षा मुंबईत कोरोना मृतांची संख्या अधिक

मुंबईत कोरोनामुळे मृत्यांचा आकडा पाहून चिंता वाढल्या आहेत. 

Updated: Jul 7, 2020, 05:26 PM IST
मुंबईने चीनला टाकलं मागे, चीनपेक्षा मुंबईत कोरोना मृतांची संख्या अधिक title=

मुंबई : देशात कोरोना रुग्णांमध्ये दररोज मोठी वाढ होत आहे. प्रत्येक दिवशी भारतात कोरोनाच्या बाबतीत नवीन रेकॉर्ड स्थापन होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे मुंबईत कोरोनामुळे मृतांच्या संख्येने चीनला ही मागे टाकलं आहे. मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या 85,724 झाली असून आतापर्यंत 4,938 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये कोरोनामुळे 4,634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 83,565 जण कोरोना संक्रमित झाले आहेत.

चीनमध्ये सध्या रोज एकेरी अकांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहे. पण फक्त धारावीत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या ही चीनपेक्षा जास्त आहे. मुंबईत 1 जुलैपासून दररोज 1,100 पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत. एकट्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 2,11,987 झाली आहे.

4 जून रोजी महाराष्ट्राने जर्मनी (1,98,064) आणि दक्षिण अफ्रिका (2,05,721) या दोन्ही देशांना मागे टाकलं होतं. महाराष्ट्रात आतापर्यंत 9,026 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2,11,987 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 87,681 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात मृत्यू दर 4.26 टक्के आहे तर रिकव्हरी दर 54.37 टक्के आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त २ जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे कोणत्या रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. भंडारा आणि चंद्रपूर हे ते २ जिल्हे आहेत.