मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख घसरतोय. लॉकडाऊननंतर कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या आकडेवारीला ब्रेक लागला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण बेफिकिरी बाळगून चालणार नाही. गेले काही दिवस दहा हजारांच्या खाली असलेल्या रुग्णवाढीत आज किंचीतशी वाढ झाली.
दिवसभरात राज्यात 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज 237 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज 10 हजार 567 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 21 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 12 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात आजपर्यंत 56,79,746 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.7 टक्के इतकं झालं आहे. सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे.