राज्यात १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण

राज्यात काल मंगळवारी 274 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण (Corona vaccination) करण्यात आले.  काल 14 हजार 883 (52.68 टक्के) कर्मचाऱ्यांना ( employees) लस (Corona Vaccine ) देण्यात आली आहे.

Updated: Jan 20, 2021, 06:46 AM IST
राज्यात १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
संग्रहित छाया

मुंबई  : राज्यात काल मंगळवारी 274 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण (Corona vaccination) करण्यात आले.  काल 14 हजार 883 (52.68 टक्के) कर्मचाऱ्यांना ( employees) लस (Corona Vaccine ) देण्यात आली आहे. (Corona vaccination completed for 14 thousand 883 employees in Maharashtra) काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरु होते. लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकूल परिणाम झाल्याची घटना झाली नसून आजदेखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात शनिवारी 34 जिल्हे आणि 27 महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरणाचे सत्र सुरु झाले असून कोविन पोर्टलवर 17 हजार 762 व्हॅक्सीनेटर्स आणि 7 लाख 85 हजार 927 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी नऊ वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली.

लसीकरणाची आकडेवारी (सायंकाळी ७ वाजेपर्यंत )

अकोला (181), अमरावती (239), बुलढाणा (359), वाशीम (212), यवतमाळ (289), औरंगाबाद (335), हिंगोली (120), जालना (231), परभणी (229), कोल्हापूर (545), रत्नागिरी (245), सांगली (432), सिंधुदुर्ग (161), बीड (142), लातूर (221), नांदेड (276), उस्मानाबाद (238), मुंबई (595), मुंबई उपनगर (1002), भंडारा (206), चंद्रपूर (399), गडचिरोली (187), गोंदिया (144), नागपूर (656), वर्धा (386 टक्के), अहमदनगर (650), धुळे (313), जळगाव (397), नंदुरबार (285), नाशिक (710), पुणे (1403), सातारा (511), सोलापूर (681), पालघर (319), ठाणे (1434), रायगड (150)

345 6\