कोरोना लस या लोकांना देता येणार नाही - राजेश टोपे

कोरोना लस (Corona vaccine) सर्वांसाठी सुरक्षित आहे.  कोविड योद्धांना लस देण्यावर भर देण्यात येणार आहे.

Updated: Jan 13, 2021, 09:18 PM IST
कोरोना लस या लोकांना देता येणार नाही - राजेश टोपे

मुंबई : कोरोना लस (Corona vaccine) सर्वांसाठी सुरक्षित असली तरीही 18 वर्षाखालील मुलांना, ( children under 18) गरोदर महिलांना (pregnant women )आणि अँलर्जी (allergies) असणाऱ्यांना ही लस देऊ नये, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope) यांनी दिली आहे. कोविड योद्धांना लस देण्यावर भर देणार असंही त्यांनी म्हटले. 

कोविड 19 आजारावरची उपयुक्त अशी सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' लस ही मुंबई, नाशिक आणि औरंगाबादमध्ये दाखल झाली आहे. मुंबईत बीएमसीच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून आणण्यात आली. मनपाच्या परळ येथील F- दक्षिण विभाग कार्यालयात लसीचा हा साठा पोहोचला आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस बीएमसीला मिळालेत. त्यामुळे मुंबईत 16 जानेवारीला लसीकरण शक्य आहे. 
तर नाशिकमध्ये देखील कोविड लस दाखल झाली आहे. नाशिक विभागाला 1 लाख 32 हजार कोविडच्या लसीचे डोस मिळालेत. 

नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, धुळे,जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात या लसीचं वितरण होणारेय. तर औरंगाबादमध्येही कोविड लस दाखल झालीय. औरंगाबादच्या आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र या ठिकाणी ही लस ठेवण्यात आली आहे.