मुंबई : देशभरात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय. राज्यात आतापर्यंत ३८४८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत राज्यात २११ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्य हा सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला राज्य ठरला आहे. असं असताना बीएमसी कोरोना रूग्णांची आकडेवारी लपवतेय असा विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे.
#CoronavirusUpdates
As on 18-April, 4:00pm#NaToCorona https://t.co/78NMKRhpD9 pic.twitter.com/u9nXFiwSKY— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 18, 2020
गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित नवीन रूग्णांची संख्या कमी होत असल्याची माहिती मिळत असतानाच शनिवारी राज्यात ११ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईत ५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. विरोधी पक्षानेतील प्रविण दरेकरांकडून असा आरोप केला जातोय की, बीएमसीकडून कोरोनाबाधित रूग्णांची आकडेवारी ही लपवली जात आहे. ICME निकषावरून टेस्ट होत नाही. तसेच कोरोनाबाधित रूग्णांच्या आकडेवारीत घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षाचा सत्ताधाऱ्यांवर होताना दिसत आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच देशभरातून कौतुक झालं. मुंबई ही आर्थिक राजधानी असताना सरकारने कोरोनाची परिस्थिती ज्या संयमाने सांभाळली आहे. याचं कौतुक होताना दिसत आहे. मात्र विरोधी पक्षाकडून सतत सरकारवर टीका होताना पाहायला मिळते.