मुंबई : राज्यात कोरोनाबाधीतांची संख्या पाचवर गेली आहे. तर मुंबईत सहा जणांना रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्व कोरोना बाधितांवर उपचार सुरु करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयपीएलसह राज्यातील इतर महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलायचे का या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाचे सावट दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा लवकर घेऊन शाळांना लवकर सुट्टी देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन लवकर गुंडाळण्यावर चर्चा होण्याची शक्यता
#BreakingNews । राज्यात कोरोनाबाधीतांची संख्या ५वर ।सर्व कोरोना बाधितांवर उपचार सुरु करण्यात आलेत । या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली । https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/66InuVop42
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 11, 2020
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाची भीती नाही. सगळ्यांनी मास्क वापरण्याची गरज नाही, स्वच्छ रुमालाने काम भागते. दुबईत ४० लोकांचा ग्रुप वीणा वर्ल्ड मार्फत गेले होते, त्यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे. प्रदेशातून जे लोक आलेत आणि त्यांना लक्षण आढळतायत त्यांनी शासनाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परीक्षा लवकर घेता येतील का याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, असेही ते म्हणालेत.