मुंबई : कोरोना (Coronavirus) नियंत्रणात ठेवण्यात धारावीने ( Dharavi) चौकार ठोकला आहे. चौथ्यांदा धारावीत एकही रुग्ण सापडलेला नाही. जनजागृती, कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर दिल्यामुळे धारावी कोरोनामुक्त होत आहे. धारावीत 14, 15 आणि 23 जूनला एकही रुग्ण सापडला नव्हता. तसेच चौथ्यांदा 5 जुलैला धारावीत एकही रुग्ण सापडलेला नाही. (zero corona patient for the fourth time in Dharavi)
राज्यात 35 दिवसांत करोनाबाधितांचं प्रमाण 5.30 टक्क्यांवर आहे. 72 लाख 30 हजार 384 संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. केवळ 5 टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसा वैद्यकीय शिक्षण खात्याचा अहवाल आहे.
नागपूरसह राज्यातील अनेक शहरे आणि जिल्ह्य़ात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च आणि एप्रिल 2021 मध्ये संशयित रुग्णांच्या दैनिक चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण 15 ते 30 टक्क्यांपर्यंत गेले होते. मात्र आता स्थिती सुधारलेली दिसत आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालात 30 मे 2021 ते 3 जुलै 2021 या 35 दिवसांत राज्यात 72 लाख 30 हजार 384 संशयितांच्या चाचण्या झाल्या.
दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सात हजारांवर पोहोचलेली रूग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार रूग्णांची नोंद झाली आहे.