मुंबई : दहीहंडीवरची बंदी उठवल्यानंतर मुंबईत दहीहंडीचा उत्साह दिसून येतोय. एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा तयार झालेत. ढाक्कुमाकुमचा गजरचा सगळीकडे ऎकायला मिळत आहे.
सकाळपासून गोविंदा पथकं दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये जात आहेत. त्यात रिमझिम पाऊसही सुरू असल्याने गोविंदांसह सर्वांच्याच आनंदाला उधाण आले आहे. अशात अनेकजण घरीच आहेत. ज्यांना बाहेर जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी मुंबईतील अनेक प्रसिद्ध दहीहंड्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग आम्ही घेऊन आलो आहोत.
घरबसल्या तुम्ही दहीहंडीचं लाईव्ह स्ट्रिमिंग बघू शकता. यंदाच्या वर्षी उंचच उंच हंड्यांचा थरार रंगण्याची चिन्हं आहेत. गेल्यावर्षी न्यायालयाच्या आदेशामुळं हंड्यांच्या उंचीवर आणि बालगोविंदांच्या सहभागावर निर्बंध घालण्यात आले होते. गोविंदांचं वय 14 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि गोविंदांनी आवश्यक सुरक्षा नियम पाळावेत, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालायनं यंदाही दिल्या.
एकीकडं आयोजकांनी बक्षिसांची आमिषं वाढवली आहेत. तर दुसरीकडं उंच थर रचण्याच्या नादात कोणताही धोका पत्करणार नाही, अशी सावध भूमिक गोविंदा पथकांनी घेतली आहे.
गेली दोन वर्षं कोर्ट कचे-यांमुळं दहीहंडी गाजली. यंदाचं वर्ष त्याला अपवाद ठरलंय. त्यातच सरकारनं उंचीबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं आपल्या सुरक्षेची खबरदारी आता गोविंदांनीच घ्यावी लागणार आहे.