दहिसर येथे मोठी आग, हवेत धुराचे लोट

दहिसर पूर्व येथे मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्यात.

Updated: Nov 17, 2020, 06:46 PM IST
दहिसर येथे मोठी आग, हवेत धुराचे लोट

मुंबई : दहिसर पूर्व येथील शिवदत्त इमारत जवळ, जया नगर, आनंद नगर, येथे मोकळया मैदानात ठेवलेल्या प्लास्टिक पाईपांना संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल आहेत.

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून मात्र मोठा प्लास्टिक पाइप जळून खाक झाला आहे. सध्या आग आटोक्यात आहे,अग्निशमन दलाच्या जवानाकडून फायर कूलिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.