मुंबईत डेंग्यूचा फैलाव, साडेसात हजार ठिकाणी सापडल्या अळ्या

एकीकडे मुसळधार पाऊस मुंबईत सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईत डेंग्यूचाही फैलाव होऊ लागलाय.

Updated: Jul 19, 2017, 07:33 PM IST
मुंबईत डेंग्यूचा फैलाव, साडेसात हजार ठिकाणी सापडल्या अळ्या  title=

मुंबई : एकीकडे मुसळधार पाऊस मुंबईत सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईत डेंग्यूचाही फैलाव होऊ लागलाय. मुंबईत एकूण ७ हजार ५८६ ठिकाणी डेंग्यू तर २,६७४ ठिकाणी मलेरियाच्या आळ्या सापडल्या आहेत.

जानेवारी ते जुलै दरम्यान ६२ लाख घरं तपासण्यात आली. ८ हजार ७४४ नोटीसा देण्यात आल्या, तर २० लाखांची दंड वसुली करण्यात आलीय. डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येते. नोटीस प्रामुख्याने पाण्याची टाकी डास प्रतिबंधक नसणे, विहीर डास प्रतिबंधक न करणे, डास प्रतिबंधाच्या दृष्टीने काळजी न घेणे इत्यादी कारणांसाठी देण्यात येतात.