आघाडी सरकार कुचकामी, ‘ती’ मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही - फडणवीस

मुख्यमंत्र्यांसारखे वागा, संयम हा कृतीत बोलण्यात दिसला पाहिजेत. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला बघून घेऊ असे म्हणणे, हे शोभणारे व्यक्तव्य नाही, अशी टीका  उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.  

Updated: Nov 28, 2020, 12:55 PM IST
आघाडी सरकार कुचकामी, ‘ती’ मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही - फडणवीस
संग्रहित छाया

मुंबई : राज्य सरकारच्या वर्षपूर्तीला विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. कुचकामी सरकार ठरले आहे. धमक्या कसल्या देता, काम करून दाखवण्याचा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. जनतेचा विश्वासघात करून सरकार सत्तेवर आल्याची टीका. विकासावर चर्चा करत नाही. चिरडण्याची भाषा ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत. ही लोकशाही आहे. जनतेचा विश्वास घात करुन हे सरकार आले आहे, असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसारखे वागा

महाराष्ट्रच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) कधी पाहिलेले नाहीत. हे सरकार असफल ठरले आहे, बदल्यांचे दलाल राज्यात फिरत आहेत, अशी अवस्था आधीच्या १५ वर्षांच्या काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात नव्हती. मुख्यमंत्र्यांसारखे वागा, संयम हा कृतीत बोलण्यात दिसला पाहिजेत. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला बघून घेऊ असे म्हणणे, हे शोभणारे व्यक्तव्य नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. मुख्यमंत्री यांची ती मुलखात वाटत नाही, त्यावर प्रतिक्रिया देण्याबाबत ती त्या लायकीचीच नाही.

'हे सरकार अपयशी आहे'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही, अशी टीका केली. राज्यातील आघाडी सरकार हे पूर्णता कुचकामी ठरले आहे. या सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या राज्याच्या हिताचे व्हिजन दिसून येत नाही. आम्ही काय केले आणि पुढे काय करणार याबाबत त्यांनी काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी आहे, हेच दिसून येत आहे, असे फडणवीस म्हणाले.

सरकारने कोरोना थोपवला का?

एका वर्षात सरकारचे विशेष असे काही दिसलेले नाही. हे पाच वर्षे सरकार चालवा, पण धमक्या देऊ नका, प्रशासकीय कारभार कुठेही दिसत नाही. हे सरकार विश्वास घातातून आलेले सरकार आहे. या सरकारची उपलब्धी काय तर स्थगिती देणे आहे. आरे कारशेडबाबत सत्य हे मुंबई भाजप मुंबईकरांसमोर नेणार आहे. आरे कारशेडवरुन शिवसेना फटकारले. काही अधिकारी आपल्या फायद्याकरता इगो मसाज करत आहे. मुंबईच्या विरोधातले हे निर्णय आहेत. हे सरकार म्हणतात कोरोना थोपवला? सर्वात जास्त कोरोना रुग्ण, कोरोना मृत्यू हे महाराष्ट्रात. मग कसा कोरोना थोपवला ? कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, तो आम्ही उघड करणार, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

रस्त्यावर उतरणारच

राज्यात करोनाची परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिलेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार केली होती.  या तक्रारीवरून देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. पंतप्रधान मोदींकडे कितीही तक्रारी केल्या, तरीही आम्ही जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरणार. आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल, असा इशारा दिला.

आवाज चिरडता येणार नाही!

 सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे! एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.