राणा दाम्पत्याला अटक, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर थेट टीका केली आहे.

Updated: Apr 23, 2022, 07:13 PM IST
राणा दाम्पत्याला अटक, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर थेट टीका केली आहे.

महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले तरी आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ल साधा गुन्हा दाखल नाही पण महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा, साधी दखल सुद्धा नाही. हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर थेट अटक असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे.

राणा दाम्पत्यावर 153 अ नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली गेली आहे. खार पोलीस उद्या सकाळी 11 वाजता त्यांना कोर्टात हजर करणार आहे.

संजय राऊत, अनिल परब आणि मुख्यमंत्र्यांवर ही गुन्हा दाखल करण्याची मागणी राणा यांनी केली आहे.