मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली आहे. 153 (A) कलमाखाली राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, खार पोलीस स्थानकात पोहचल्यावर राणा दाम्पत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) आणि अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
काय म्हटलं आहे तक्रारीत
- काल संध्याकाळी मातोश्रीवर मिटिंग घेऊन आजच्या दिवसासाठी विशेष प्लान केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार शेकडोंचा जमाव मातोश्रीसमोर बोलावण्यात आला. त्यांच्याकडे बॅट, हत्यारसदृष्य वस्तू होत्या. आम्हाला जीवे मारण्यात येईल असं वातावरण तयार करण्यात आलं.
- अॅम्ब्युलन्ससुद्धा तयार ठेवण्यात आली. अॅम्ब्युलन्स राणा दाम्पत्यासाठी आहे अशा घोषणा दिल्या
- याच दरम्यान संजय राऊत यांनी ट्विट करत चिथावणी दिली.
- आम्ही फक्त हनुमान चालिसा म्हणणार होतो, पण ठाकरेंसह इतर नेत्यांनी चिथावणी दिली.
- आम्हाला शारीरिक नुकसान होईल अशी परिस्थिती तयार करण्यात आली.
- आमच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब जबाबदार राहतील
मुख्यमंत्री, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राणा दाम्पत्याने केली आहे. सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जी कलमं लावण्यात आली ती कलमं मुख्यमंत्री, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर लावण्यात यावीत अशी मागणी राणा दाम्पत्याने केली आहे.