'सत्ता में आता हूं समझ मे नही', देवेंद्र फडणवीसांच्या masterstroke नंतर भन्नाट मीम्स

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष एकदी वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होत असतानाच एक मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्ट्ररस्ट्रोक खेळला. 

Updated: Jun 30, 2022, 05:59 PM IST
'सत्ता में आता हूं समझ मे नही', देवेंद्र फडणवीसांच्या masterstroke नंतर भन्नाट मीम्स title=

मुंबई : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष एकदी वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होत असतानाच एक मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्ट्ररस्ट्रोक खेळला. 

एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. तर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला. 

या निर्णयासह फडणवीस यांनी सर्वांना एकच 'जोर का झटका' दिला.  फडणवीस यांच्या या घोषणेनंतर शिंदे यांच्या ठाण्यात एकच जल्लोषाला सुरुवात झाली.

"राज्याचा विकास हे मुख्य उदिष्ट असणार आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पुढे नेणार आहे. महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यातील अनेका भागांमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार ही घोषणा ऐकल्यानंतर जल्लोष साजरा केला. तर मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर राहून मास्टरस्ट्रोक लावला आहे. यावरून आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.