धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

 मुंडेसह त्यांच्या कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण 

Updated: Jun 12, 2020, 07:41 AM IST
धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे या अगोदर दोन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रिमंडळात कार्यरत असलेल्या मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता आता वाढली आहे. 

धनंजय मुंडेसह त्यांच्या कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी रात्री या सगळ्यांच्या चाचणीचा अहवाल आला. धनंजय मुंडे आज शुक्रवारी रूग्णालयात दाखल होणार आहेत. धनंजय मुंडे दररोज मंत्रालयात जात होते. मंगळवारी झालेल्या बैठकीला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते. 

मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, पीए, मुंबईतील वाहन चालक, बीडचे वाहनचालक आणि स्वयंपाकी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणालाही लक्षणे नाहीत. या आठवड्यात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुंडे हजर होते. धनंजय मुंडे या सोमवारी बीडहून मुंबईत परतले असून ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते. 

यापूर्वी मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे आज रूग्णालयात दाखल होणार आहेत. मुंडे तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरानाची लागण झाली आहे.  यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती, त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे

कोरोनाचं संकट आता सामान्यांकडून नेत्यांपर्यंत पोहोचत आहेत. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. सरकार मधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याने चिंता अधिक वाढली आहे. जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांची मंत्रालयात उपस्थिती नव्हती. मात्र आता मंत्रालयात उपस्थित असलेल्या धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता वाढली आहे.