मुंबई : बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी. जर तुम्ही सध्या पेरणी करत असाल किंवा पेरणी करण्याच्या विचारात असाल तर थोडे थांबा. कारण, राज्याच्या कृषी विभागाने एक आवाहन केले आहे. जोपर्यंत आपापल्या विभागात ६५ ते १०० मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र पेरणी पूर्वीची मशागत करता येणार आहे.
याशिवाय महत्वाची बाब म्हणजे शेतकर्यांना आता आपल्या मोबाईलवर पावसाचे अचूक अंदाज आणि कृषि विभागाच्या सूचना प्रत्येक शुक्रवारी मिळणार आहेत. शेतकर्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.