Mumbai Localमधून श्वानाचा प्रवास, स्टेशनवर उतरताच मिळाली शाब्बासकी

प्राण्यांना बोलता येत नसेल तरी भाषा समजते. याची अनेक उदाहरण आपण आपल्या आजूबाजूला पाहात असतो. पण आता एक जबरदस्त उदाहरण समोर आलं आहे. हे उदाहरण म्हणजे माणसांच्या शहाणपणाला चपराक देखील म्हणायला हरकत नाही. याचं कारण वारंवार लोकलनं प्रवास करताना धावत्या लोकलमधून न उतरण्याचं आवाहन केलं जातं. तरीदेखील अनेक नागरिक धावती लोकल पकडण्यासाठी जीव धोक्यात घालतात.

Updated: Jan 30, 2021, 07:55 PM IST
Mumbai Localमधून श्वानाचा प्रवास, स्टेशनवर उतरताच मिळाली शाब्बासकी title=

मुंबई: प्राण्यांना बोलता येत नसेल तरी भाषा समजते. याची अनेक उदाहरण आपण आपल्या आजूबाजूला पाहात असतो. पण आता एक जबरदस्त उदाहरण समोर आलं आहे. हे उदाहरण म्हणजे माणसांच्या शहाणपणाला चपराक देखील म्हणायला हरकत नाही. याचं कारण वारंवार लोकलनं प्रवास करताना धावत्या लोकलमधून न उतरण्याचं आवाहन केलं जातं. तरीदेखील अनेक नागरिक धावती लोकल पकडण्यासाठी जीव धोक्यात घालतात.

एक श्वानानं मात्र नियमांचं पालन केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की श्वान धावत्या लोकलमध्ये चढला आहे. त्याला उतरायचं आहे. लोकलमध्ये अनाऊंसमेंट सुरू आहे. तेवढ्यात स्टेशन येतं. श्वान लोकल पूर्णपणे थांबण्याची वाट पाहातो. त्यानंतर लोकल आणि फलाटातील अंतर पाहून आपला जीव सांभाळून उतरतो. लोकलचा वेग कमी झाल्यानंतरही त्याला उडी मारता आली असती. मात्र त्यानं तसं केलं नाही. लोकल पूर्ण थांबल्यानंतर उतरला.

नुकताच एका वृद्ध माणसाचा धावती लोकल पकडत असताना अपघात झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात जीव वाचला होता. वारंवार सांगूनही धावती लोकल नागरिक पकडत असतात. जीव धोक्यात घालून हे करत असतात. मात्र श्वानानं जे केलं ते पाहून त्यांचं कौतुक होत आहे. श्वानाला कळलं पण धावत्या लोकलमधून उतरणाऱ्या किंवा धावती लोकल पकडणाऱ्या माणसांना कधी कळणार असा सवालही उपस्थित होत आहे.