Drug Case: दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला अटक, सुशांत कनेक्शन समोर

 अजुन कोण अमली पदार्थाच्या धंद्यात गुंतलेत त्याचा उलगडा होणार

Updated: Feb 5, 2021, 11:50 AM IST
Drug Case: दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला अटक, सुशांत कनेक्शन समोर  title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपुत (Sushant Singh Rajput) ड्रग्स प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा चौकशीचा सपाटा सुरु केलाय. एनसीबीने मुंबईत काल रात्री दोघांना अटक केली. सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्नीचवाला (Rahila Furniturewala) आणि ब्रिटिश नागरिक करण सजनानीला (Karan Sajnani) ड्रग्ज प्रकरणात अटक केली. या आधीही या दोघांना अटक केली होती. आता पुन्हा अटक झाली असल्याने अजुन कोण अमली पदार्थाच्या धंद्यात गुंतलेत त्याचा उलगडा होणार आहे.

याआधी एनसीबीने गुरुवारी जगताप सिंह आनंदला अटक केली. जगताप सिंह हा ड्रग्ज पेडलर करमजीत सिंहचा भाऊ आहे. जगताप याप्रकरणी करमजीतच्या संपर्कात होता. ज्यानंतर एनसीबीने जगतापला ताब्यात घेतले. करमजीतला आधीच अटक करण्यात आलीय. 

मुंबई एनसीबीने काल पुन्हा एकदा अभिनेत्री दिया मिर्झाचा एक्स मॅनेजर राहिला फर्नीचवाला आणि ब्रिटीश नागरिक करण सजनानी यांना केस नंबर 16/20    प्रकरणी अटक केलीय. 

नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो एका पाठोपाठ एक कारवाई करत आहे. याप्रकरणी अटकसत्र सुरुच आहे. आतापर्यंत यामध्ये अनेक बॉलीवूड स्टार्सची नावं समोर आली. नार्कोटीक्स ब्युरोने बॉलीवूड सेलिब्रिटींच्या गॅझेट्सची देखील तपासणी केली. एनसीबीने ही गॅजेट्स फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली होती. आतापर्यंत याप्रकरणी अर्जुन रामपाल, दीपिका पादुकोन, भारती सिंग सारख्या सेलिब्रिटींचे नाव समोर आलंय.