सध्या सगळीकडे सणांच वातावरण आहे. दसरा-दिवाळीला मोठ्या प्रमाणावर सोने-घर आणि वाहने खरेदी केली जातात. विजयादशमीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. ग्राहकांना खऱ्या अर्था सोने लुटले असून परंपरा जपली आहे. 1200 किलो सोन्याची खरेदी मुंबईकरांनी केली आहे. लग्नसराई-सण-समारंभ या दृष्टीकोनातून सोन्याची खरेदी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवसात सोने खरेदी करणे चांगले मानले जाते. सकापासूनच सोने खरेदीला ग्राहकांनी सुरुवात केली. तसेच काही ग्राहक गुतंवणूकीच्या दृष्टीकोनातून सोन्याची खरेदी करतात. यामध्ये वळी, नाणी, बिस्किटांच्या स्वरुपात सोने खरेदी केली जाते.
आता काही ग्राहक चांदीमध्ये देखील गुंतवणूक करताना दिसले. सोमवारी रात्रीपासूनच कच्चे तेल आणि सोन्याचे दर थोडे कमी झालेले दिसले. मात्र दर काहीही असला तरीही सोने खरेदी करताना ग्राहकांना मनमुराद आनंद लुटला.
मुंबई आणि महाराष्ट्रात दसऱ्याच्या मुहूर्तावर 120 टन सोन्याची विक्री झाली.याचे मूल्य जर काढले तर 250 करोड रुपयांची ही उलाढाल आहे.आता सोन्याची किंमत 62 हजार रुपये असून पुढील काही दिवसात सोन्याचे भाव 64 हजार होणार असल्याची शक्यता आहे.त्यामुळे ही विक्री झाली आहे.काल दसऱ्याच्या मिहूर्तावर रात्री उशिरापर्यंत सोने खरेदीचे व्यवहार सुरू होते.दसऱ्याच्या मूहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.त्याच बरोबर पुढील 6 महिन्यात होणारे लग्न त्यासाठी काही जणांनी बुकिंग सुद्धा करून ठेवली असल्याचे ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले आहे.
दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी देखील केली जाते. मुंबईतील चार आरटीओमधून 9572 वाहनांची नोंदणी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 475 ने अधिक आहे. तसेच लग्नसराईच्या मुहूर्तावर देखील ग्राहक सोने आणि वाहन खरेदी दसऱ्याला करतात. दिवाळीला तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतील.
जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असतो. यामुळे अनेकांनी आताच सोने खरेदी करण्याचा प्राधान्य दिलं आहे. तसेच नोव्हेंबरपासून लग्नाचे शुभ मुहूर्त आहेत अशावेळी ग्राहक जास्त प्रमाणात दागिने खरेदी करतात. नवरात्रीच्या अगदी पहिल्या दिवसांपासूनच ही खरेदी पाहायला मिळाली.
16 ते 24 ऑक्टोबरदरम्यान राज्यात 80,186 वाहनांची खरेदी झाली. गेल्यावर्षी दसऱ्यापूर्वी 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत 76,157 वाहनांची खरेदी झाली होती. त्यामुळे यंदा वाहन खरेदीतही वाढ झालेली पाहायला मिळत आहे.