'जैसी करनी वैसी भरणी', संजय पांडे यांच्या अटकेनंतर सोमय्यांची टीका

संजय पांडे यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. त्यांना ईडीकडून अटक झाली आहे. सीबीआयकडून देखील त्यांची चौकशी सुरु आहे.

Updated: Jul 19, 2022, 08:55 PM IST
'जैसी करनी वैसी भरणी', संजय पांडे यांच्या अटकेनंतर सोमय्यांची टीका title=

मुंबई : जैसी करनी वैसी भरणी माफिया सरकार मधले पोलीस अधिकारी संजय पांडे यांना अटक अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. तर मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी 'मिशन कम्पलीट टुडे' अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. (ED arrest Sanjay Pandey)

संजय पांडे यांची दिल्ली ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. आज सकाळी चौकशीला जाण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

एनएसई को-लोकेशन घोटाळा प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आज ईडीने अटक केली. त्याला मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या कर्मचार्‍यांच्या कथित फोन टॅपिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी संजय पांडे आज ईडीसमोर हजर झाले होते. संजय पांडे हे 30 जून रोजी निवृत्त झाले होते.

मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांच्या कारकिर्दीपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणूनही काम केले आहे. या दरम्यान संजय पांडे यांच्यावर अनेक आरोप झाले. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने सोमवारी सांगितले की, त्यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपावरून पांडे आणि मुंबईचे आणखी एक माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी केली होती. 

एनएसई कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंगप्रकरणी सीबीआय आणि ईडी या दोघांनी संजय पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला 'को-लोकेशन' घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशीही केली होती.

CBI ने आरोप केला आहे की नारायण आणि रामकृष्ण, वाराणसी आणि हल्दीपूर यांनी 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्याचा कट रचला ज्यासाठी त्यांनी 2001 मध्ये पांडे यांनी स्थापन केलेल्या ISEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कामावर ठेवले होते.

आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनी उघडली होती, मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. कथित बेकायदेशीर टॅपिंगसाठी कंपनीला 4.45 कोटी रुपये मिळाल्याचा सीबीआयचा आरोप आहे. एजन्सीने दावा केला आहे की कंपनीने टॅप केलेल्या संभाषणाची लेखी प्रत स्टॉक एक्सचेंजच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला देखील दिली आहे.