ओमकार बिल्डर्सच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरला ईडीकडून अटक

तीन दिवसांपासून ओमकार ग्रूपशी संबधित अनेक ठिकाणांवर ईडीचं छापासत्र 

Updated: Jan 27, 2021, 07:40 PM IST
ओमकार बिल्डर्सच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरला ईडीकडून अटक

मुंबई : मुंबईतल्या ओमकार बिल्डर्सच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरला ईडीनं अटक केली आहे. कमलकिशोर गुप्ता आणि बाबूलाल वर्मा अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. कमलकिशोर गुप्ता हा ओमकार ग्रूपचा चेअरमन आहे. तर बाबूलाल वर्मा मॅनेजिंग डायरेक्टर असल्याचं सांगण्यात येतं आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून ओमकार ग्रूपशी संबधित अनेक ठिकाणांवर ईडीचं छापासत्र सुरू होतं. त्यानंतर ईडीनं या दोघांना अटक केली आहे. ओमकार ग्रूपचे मुंबईत अनेक ठिकाणी बांधकाम प्रकल्प आहेत.