मुंबई : राज्यात अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे-भाजपचं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व सोपस्कारानंतर राज्यातील जनतेचं कोणत्या आमदाराला कोणतं खातं मिळणार, याकडे लक्ष लागून राहिलं होतं. या मंत्रिमंडळाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. (eknath shinde group and bjp government total 12 leader may be give oath before aashadhi ekadashi know who will get ministery)
पहिली गोष्ट म्हणजे हा मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशीपूर्वी होणार असल्याचं सांगितलंय. जातंय. तसेच पहिल्या टप्प्यात 12 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये पहिला मंत्री मंडळ विस्तार होणार आहे.
उदय सामंत
दादा भुसे
बच्चू कडू
गुलाबराव पाटील
गिरीष महाजन
चंद्रकांत पाटील
आशिष शेलार
राजेंद्र यड्रावकर
संजय कुटे
प्रवीण दरेकर
संजय राठोड
तानाजी सावंत.