Dasara Melava: शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी, बैठकीत मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.

Updated: Sep 28, 2022, 06:26 PM IST
Dasara Melava: शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी, बैठकीत मोठा निर्णय title=

मुंबई : दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आज शिंदे गटाची (Shinde group meeting) बैठक झाली. दसरा मेळाव्यासाठी (Dasara melava) शिंदे गटाकडून 7 हजार बस मुंबईत आणण्याची तयारी सुरु आहे. जवळपास 3 हजार एसटी बसेत तर 4 हजार खासगी बसेस मुंबईत आणायची तयारी सुरु आहे. अडीच ते तीन लाख शिवसैनिक मुंबईत दसरा मेळाव्यात येणार असल्याची चर्चा आहे. (Shinde group meeting for dasara melava)

एसटी महामंडळ, स्थानिक ट्रान्सपोर्ट, खासगी वाहने, पोलीस विभाग, ट्रॅफिक डिपार्टमेंट यांच्या नियोजना बाबत ही बैठकीत चर्चा झाली. येणारी वाहने कशी आणायची, लांब पल्ल्याच्या गाड्या योग्य वेळेत दसरा मेळाव्यात कशा पोहोचतील यावर चर्चा झाली. मंत्री,आमदार आणि खासदार यांना जबाबदारीचे वाटप केले गेले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेत 2 गट पडले असून दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे. हा संघर्ष थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. यावर सुनावणी देखील सुरु आहे. एकनाश शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांनाच भाजपकडून मुख्यमंत्री करण्यात आलं.

शिंदे गटाने आम्हीच शिवसेना असल्याचा आधीपासून दावा केला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्यावर देखील दावा केला होता. यासाठी त्यांनी शिवतिर्थ मिळावं यासाठी ही अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर ठाकरे गटाला शिवतिर्थाची जारा देण्यात आली.

शिंदे गटाने BKC येथील एमएमआरडीए मैदानावर आता जय्यत तयारी करण्यासाठी सुरुवात केली आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला कोण कोण नेते हजर राहणार याकडे ही महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची देखील सभा होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटात मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो.