मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या भडक्यात होरपळणाऱ्या महाराष्ट्रतल्या जनतेला वीजदरवाढीचा शॉक बसला आहे. राज्यातल्या घरगुती आणि कृषी वापरासाठीची वीज ३ ते ४ टक्क्यांनी महाग झाली आहे. १ सप्टेंबरपासून राज्यात नवे दर लागू झाले आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखऱ बानवकुळे यांनी स्वतःच नागपुरात ही माहिती दिली आहे. राज्यातल्या वीज वितरण कंपनीकडे एकूण ३४ हजार ६४६ कोटी तूट आहे. त्यापैकी २० हजार ६५१ कोटी रुपय़े भरून काढण्याची परवानगी वीज नियामक आयोगानं दिली आहे. त्यानुसार वर्षी वीजदर वाढवण्यात येणार आहेत.
यंदा तीन ते पाच टक्के वीजदर वाढ करण्याची परवानगी मिळाली आहे. तर पुढच्यावर्षी चार ते सहा टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. १ सप्टेंबरला लागू झालेल्या नव्या दरपत्रकानुसार आता शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरात युनिट मागे २४ पैसे वाढवण्यात आले आहेत.