मुंबई : व्यन्यजीव सप्ताहामध्ये महाराष्ट्र नेचर पार्क येथे मंगळवारी महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने नॅचरलिस्ट फाउंडेशन आणि मरीन बायो डायव्हर्सिटी ऑफ इंडिया यांच्यावतीने छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. या वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून नवीन पिढीला समुद्राखालील जीवनाबद्दल जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश आहे. मंगळवारी हे प्रदर्शन सुरू झाले असून 7 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.
यावेळी महानगर सहायक आयुक्त संजय खंदारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित शाळेतील मुलांना संबोधित करताना ते म्हणाले की मुले ही देशाच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल. त्यामुळे त्यांना समुद्री प्रदुषण आणि त्यामुळे होणारे परिणाम याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. या प्रदर्शनातून खुपकाही शिकण्यासारखे आहे.
त्यामुळे येत्या काळात ग्रेटा थनबर्ग ही भारतातून असेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे अशा प्रकारची प्रदर्शने सर्वत्र व्हायला हवी असे मत देखील खंदारे यांनी व्यक्त केले. यावेळी जवळपास १४० छायाचित्रकार या प्रदर्शनात आले होते. यामधील २८ छायाचित्रकार हे देशातील विविध भागातून आले होते. त्यावेळी त्यांनी समुद्री जीवनाविषयी फोटो टिपले.