मुंबई : Mumbai High Court on Sachin Waze : मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून तंबी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सचिन वाझे याच्या वकिलांना माहिती लपवल्याप्रकरणी चांगलेच फटकारले आहे. (Explosives case : Mumbai High Court struck down to Sachin Waze)
चांदिवाल आयोगाच्या कारभाराविरोधात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घ्या, अन्यथा कठोरपणे ती फेटाळून लावू, असा स्पष्ट शब्दात न्यायालयाने इशारा दिला आहे. न्यायालयाने उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णय कळवण्याचे निर्देश दिले आहे. आयोगाला दिलेले अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात वाझे याने उच्च न्यालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने फटकारले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात चांदिवाल आयोगाच्या कारभाराविरोधात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घ्या अन्यथा कठोरपणे ती फेटाळून लावू, अशी तंबी सचिन वाझे याला मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. आयोगाला दिलेले चार अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात वाझे याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, योग्य माहिती लपवत असल्याबद्दल खंडपीठाने वाझे याच्या वकिलांना चांगलेच फटकारले.
यावरुन न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. त्याचवेळी दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घ्या अन्यथा कठोरपणे ती फेटाळून लावू, अशी तंबी दिली.