विवाहबाह्य संबंधामुळे गेली परराष्ट्र मंत्र्याची नोकरी, पण 'ती' सुंदर तरुणी आहे तरी कोण?

Extramarital Affair Former Chinese Foreign Minister:  किन गँग हे यावर्षी जून महिन्यात ते गूढपणे बेपत्ता झाले. तेव्हा त्यांच्याबद्दलची चर्चा सुरू झाली. त्यांच्या विवाहबाह्य संबंधांचे प्रकरण समोर आले होते. त्यांच्या संसारात एका सुंदर मुलीने एंट्री केली होती. काय होते हे प्रकरण? कोण आहे ती सुंदर तरुणी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 28, 2023, 01:29 PM IST
विवाहबाह्य संबंधामुळे गेली परराष्ट्र मंत्र्याची नोकरी, पण 'ती' सुंदर तरुणी आहे तरी कोण? title=

Extramarital Affair Former Chinese Foreign Minister: राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे किन गँग हे एकेकाळी चीनचे परराष्ट्र मंत्री होते. किन गँग हे त्यांच्या कारकिर्दीत अनेक कारणांमुळे चर्चा राहिले. ते एक आक्रमक परराष्ट्र मंत्री म्हणून ओळखले जायचे. पण यावर्षी जून महिन्यात ते गूढपणे बेपत्ता झाले. तेव्हा त्यांच्याबद्दलची चर्चा सुरू झाली. त्यांच्या विवाहबाह्य संबंधांचे प्रकरण समोर आले होते. त्यांच्या संसारात एका सुंदर मुलीने एंट्री केली होती. काय होते हे प्रकरण? कोण आहे ती सुंदर तरुणी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

चीनचे परराष्ट्र मंत्री किन गॅंग बेपत्ता होण्यापूर्वी त्यांच्याबद्दल 25 जून रोजी जाहीरपणे तक्रार करण्यात आली होती. यावेळी कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही. बेपत्ता झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर चीन सरकारने त्यांना त्यांच्या पदावरून हटवले.

क्विन गँग आणि विवाहबाह्य संबंध

क्विन गँग यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला जगापासून लपवून ठेवल्याचे वृत्त समोर आले आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्विन यांचे ​​चिवेई टीव्ही अँकर फू झियाओटिनसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना एक मूल देखील आहे. या मुलाचा जन्म अमेरिकेत झाला आहे. असे असले तरी काही अमेरिकन वृत्तपत्रांनी गँग यांच्या बेपत्ता होण्यामागे कट कारस्थान असल्याचे म्हटले आहे. 

फू झियाओटिनची लाईफस्टाइल

फू झियाओटिनच्या लाईफस्टाइलची चर्चा प्रसारमाध्यमांतून होत असते. तिने कॅलिफोर्नियाच्या उपनगरातील खासगी जेट ट्रिपचे फोटो आपल्या वेबो या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले. पत्रकारितेत 10 वर्षांची कारकीर्द असलेल्या महिलेला एवढी संपत्ती कशी मिळाली? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला गेला. तिची लाईफस्टाईल इतकी भव्य कशी असू शकते? अशाही चर्चा रंगू लागल्या. 

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, फू राहत असलेल्या कॅलिफोर्नियाच्या कोस्टल टाऊनचे भाडे 2021 मध्ये सुमारे 55 हजार डॉलर प्रति महिना होते, म्हणजे 45 लाखांपेक्षा जास्त होते. इतकेच नव्हे तर 8 बेडरूमसह तिच्या घरात एक बाहेरचा स्विमिंग पूल देखील आगेय

फू एक टॉक शो होस्ट 

क्विन गँग हाँगकाँगमधील चीनी चॅनल फिनिक्सवरील टॉक शोचा माजी होस्ट फू झियाओटिनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, असे वृत्त समोर आले आहे. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी फू आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील काही लोकांचाही हवाला देण्यात आला आहे. 

याआधी वॉल स्ट्रीट जर्नलने एका वृत्ताचा हवाला देत क्विन वॉशिंग्टनमध्ये राजदूत म्हणून काम करत असल्यापासून फूशी संबंध असल्याचे म्हटले होते.गँगने त्याच्या जीवनशैलीमुळे आपली खुर्ची गमावली, असेही  याआधी चिनी मीडियाने असेही म्हटले होते. चीनमध्ये अनैतिक लैंगिक संबंधांना लाईफस्टाईलचा भाग म्हटले जाते. 

राजकीय अफेअर ही नवीन गोष्ट नाही

वॉशिंग्टनमधील स्टिमसन सेंटर थिंक टँकने दिलेल्या माहितीनुसार, चिनी राजकारणात अफेअर हा मुद्दा किरकोळ असाच आहे. परंतु उच्चभ्रू नेत्यांचे अफेअर आणि मुलांची चर्चा जोरात होत असते. क्विनला केवळ याच कारणांमुळे काढून टाकले तर ती मोठी गोष्ट ठरेल. याबद्दल अधिक रिसर्च आवश्यक असल्याचे स्थानिक दैनिकांचे अनुमान आहे.