मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरु आहे. गणेशोत्सव आणि इतर वेळेही मुंबईकराचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक गणपती मंदिरात (Siddhivinayak Ganpati Temple Mumbai) भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. अनेकदा तर ओळखीने किंवा स्पेशल पास खरेदी करुन भक्तमंडळी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतात. मात्र आता सिद्धीविनायकाच्या दर्शनाबाबत मोठी बातमी आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी भाविकांना आवाहन केलं आहे. (fake message and mobile number viral in name of siddhivinayak temple mumbai on social media)
तुम्हाला जर सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं असेल, तर एका नंबरवर फोन करा आणि दर्शन मिळवा. अशा आशयचा एक मेसेज आणि फोन नंबर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. मात्र हा मेसेज खोटा असल्याचं समोर आलं आहे. याबाबत मंदिर समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून खोडसाळपणा केला जात आहे. सिद्धीविनायक मंदिराच्या नावाने हे खोटे मेसेज व्हायरल केले जात आहेत. तुम्हाला आम्ही दर्शन देऊ, असं या नंबरवरुन सांगितलं जात आहे. मात्र तुम्ही प्रलोभणाला बळी पडू नका, असं आवाहनही बांदेकरांनी केलं आहे.
— Shri Siddhivinayak Temple (@SVTMumbai) August 4, 2022