मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची या व्यक्तीने दिली खोटी माहिती, पोलीस करणार अटक

मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती. 

Updated: May 30, 2021, 04:02 PM IST
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची या व्यक्तीने दिली खोटी माहिती, पोलीस करणार अटक title=

मुंबई : नागपूर येथील सागर काशिनाथ मन्द्रे या व्यक्तीने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याबाबत फोन केल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. सागर काशिनाथ मन्द्रे याने यापूर्वी 12.02.2020 रोजी महसूल विभागाचे सचिव यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. प त्याचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.

मंत्रालय आणि परिसराची तपासणी केली असता काहीही आढळले नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहेत. काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही, सर्च ऑपरेशन जवळपास थांबल आहे. पोलीस सागर मेन्द्रे विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करणार आहे.

मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती. मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा पावणे 1 वाजता कंट्रोल रूममध्ये निनावी कॉल आला होता. डॉग स्क्वॉडमधील अबू आणि हिरा या श्वानांच्या माध्यमातूनत तपास सुरू झाला. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले होते.

तिन्ही इमारती आणि परिसरात सर्च ऑपरेशन करण्यात आले. मंत्रालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे.