मुंबई : शेतकरी उद्यापासून संपावर जाण्यावर ठाम आहेत. किसान क्रांतीकडून हा संप पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरली आहे. मुख्यमंत्र्यांची मंगळवारी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर शेतकरी ठाम आहेत. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.
या संपात शहरात येणारा भाजीपाला, दूध सुरूवातीला देणं बंद करण्यावर भर देण्यात आल्याचं, सोशल मीडियावरून लक्षात येत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या संपाची नेमकी काय रणनीती असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मान्सूनचं आगमन झालं असताना, शेतकरी घरापुरताच पिकवणार आहेत किंवा नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.