महाराष्ट्रात ४ दिवसात मान्सून धडकण्याची शक्यता

कडक उन्हानं त्रासलेल्या नागरीकांना पावसाचा मोठा दिलासा अपेक्षेपेक्षा लवकरच मिळण्याची शक्यता आहे. 

Updated: May 31, 2017, 08:16 AM IST
महाराष्ट्रात ४ दिवसात मान्सून धडकण्याची शक्यता title=

मुंबई : संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात मान्सून ४ दिवसात दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस आधीच देशाच्या मुख्य भूमीवर मान्सून दाखल झाला आहे. 

मंगळवारी सकाळी केरळ आणि इशान्येकडील राज्यांमध्ये मोसमी पावसाच्या पहिल्या सरी बरसल्या. कर्नाटकमध्ये येत्या २ दिवसांत पाऊस येईल आणि त्यानंतर २ ते तीन दिवसांत महाराष्ट्रामध्ये मान्सून येऊन थडकेल असा अंदाज आहे.

कडक उन्हानं त्रासलेल्या नागरीकांना पावसाचा मोठा दिलासा अपेक्षेपेक्षा लवकरच मिळण्याची शक्यता आहे.