close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गिरीश बापट यांच्या बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला भीषण आग

क्वार्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडाचे सामान होते. 

Updated: Feb 11, 2019, 11:06 PM IST
गिरीश बापट यांच्या बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला भीषण आग

मुंबई: राज्याचे अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला सोमवारी आग लागल्याची दुर्घटना घडली. मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीमध्ये गिरीश बापट यांचा ज्ञानेश्वरी हा बंगला आहे. रात्री नऊ वाजताच्या सुमारास येथील सर्व्हंट क्वार्टरमध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, या ब्रिटीशकालीनी सर्व्हंट क्वार्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडाचे सामान होते. तसेच क्वार्टरचे बहुतांश बांधकाम लाकडाचे असल्याने आग वेगाने पसरली. ज्ञानेश्वरी बंगल्यापासून काही अंतरावरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचाही बंगला आहे. सर्व्हंट क्वार्टरला आग लागलेली पाहताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन दलाला कळवले. यानंतर तातडीने अग्शिनशम दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. सुदैवाने आग लागली तेव्हा कोणीही सर्व्हंट क्वार्टरमध्ये नव्हते. सुरुवातीला सर्व्हंट क्वार्टरमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. गिरीश बापट यांच्या बंगल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा आणि महादेव जानकर यांचे बंगलेही जवळच्या अंतरावर आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गिरीश बापट तातडीने मुंबईकडे रवाना झाले.