प्रभादेवीतल्या आग लागलेल्या 'बो मोंड' इमारतीत दीपिका पदुकोणचं घर

मुंबईत प्रभादेवीतल्या 'बो मोंड' या रहिवासी इमारतीला आग लागलीय.

Updated: Jun 13, 2018, 06:23 PM IST

मुंबई : मुंबईत प्रभादेवीतल्या 'बो मोंड' या रहिवासी इमारतीला आग लागलीय. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच ही आग पुन्हा भडकली. आप्पासाहेब मराठे मार्गावर ही इमारत आहे. या इमारतीतल्या ३२ आणि ३३ व्या मजल्यावर आग लागली. या इमारतीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही घर आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरीही आग अद्याप विझलेली नाही. जवळपास ९६ रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. आगीमुळे या इमारतीच्या काचा निखळून पडल्यायत. महत्त्वाचं म्हणजे या इमारतीच्या 33व्या मजल्यावर आग लागली होती. पण अग्निशमन दलाकडे तेहेतीसाव्या मजल्यावर आग विझवण्यासाठी एवढी उंच शिडीच नाही. आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे.