फोर्टमधल्या इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

मुंबईत फोर्ट परिसरात कोठारी मेन्शन नावाच्या इमारतीला भीषण आग लागलीय.

Updated: Jun 9, 2018, 08:18 AM IST
फोर्टमधल्या इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

मुंबई : मुंबईत फोर्ट परिसरात कोठारी मेन्शन नावाच्या इमारतीला भीषण आग लागलीये. अग्नीशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, आग विझवताना इमारतीचा अर्धा भाग कोसळला. यात अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झालेत.