मध्य रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्या खोळंबल्यात

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.  

Updated: Feb 14, 2020, 06:03 PM IST
मध्य रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्या खोळंबल्यात

ठाणे : मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. डाऊन मार्गावरील गाड्या खोळंबल्यात आहेत. कळवा स्थानकाच्या बाजूला असलेल्या कचऱ्याला आग लागल्याने धुराचे लोट पसरलेत. तसेच आगीमुळे गाड्यांना कोणतीही हानी पोहचू नये म्हणून खबरदारी घेण्यात ये आहे. त्यामुळे गाड्या विलंबाने धावत आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

ठाण्याच्या जवळ असलेल्या कळवा स्टेशनलगत आग लागली. या आगीची छळ रेल्वे वाहतुकीला बसली आहे. मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचा एक बंब दाखल झाला आहे. अंडरग्राऊंड केबलमधून ठिणग्या उडाल्या आणि ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी कचरा होता. त्यामुळे कचऱ्याने मोठा पेट घेतला.