नवी मुंबई : धक्कादायक बातमी. आधी वर्षाच्या बाळाची हत्या (child murder) केली. नंतर धावत्या लोकलमधून वाशी खाडीपुलावरुन (Vashi Bridge) मुलासह स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या (woman's suicide) केली. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी या महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, ही महिला चेंबूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
चेंबूर येथे राहाणाऱ्या एका 31 वर्षीय विवाहितेने आपल्या एक वर्षीय मुलाची गळा चिरला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुलाच्या मृतदेहासह धावत्या लोकलमधून वाशी पुलावरुन उडी टाकुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्रीही घटना घडली. मानसिक संतुलन बिघडल्याने या महिलेने हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी या महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील मृत विवाहिता ही पती व कुटुंबियासह चेंबूर येथे राहाण्यास असली तरी मागील दीड दोन वर्षांपासून ती आपल्या माहेरी पुणे येथे राहात होती. त्यानंतर वर्षभरापूर्वी तिला मुलगा झाला होता. शनिवारी 6 फेब्रुवारी रोजी मुलाचा वाढदिवस असल्याने या विवाहितेची आई साहित्य आणण्यासाठी बाजारात गेली होती. यावेळी ही महिला कोणालाही न सांगता मुलाला घेऊन मुंबईला निघाली होती. परंतु रात्री दहाची मुंबईहुन पनवेल लोकल पकडली आणि वाशी खाडी पूल येताच तिने उडी मारली.
यावेळी महिला डब्ब्यात महिला तसेच गार्डदेखील होता. त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांनी दिल्यावर घटनास्थळी पोलिसांना महिलेच्या शेजारी बॅग सापडली या बॅगेत बाळाचा मृतदेह सापडला. यामुळे या बाळाची हत्या महिलेने करून आत्महत्या केला असावा, असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत. सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत. याबाबत पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला.