फ्लेचर पटेल यांचे स्पष्टीकरण, नवाब मलिक यांना ओळखत नाही, त्यांना का उत्तर देऊ?

Drugs case : ड्रग्ज केस प्रकरणात बनावट कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी फ्लेचर पटेल (Fletcher Patel)  यांनी उत्तर दिले आहे.  

Updated: Oct 16, 2021, 12:53 PM IST
फ्लेचर पटेल यांचे स्पष्टीकरण, नवाब मलिक यांना ओळखत नाही, त्यांना का उत्तर देऊ?

मुंबई : Drugs case : ड्रग्ज केस प्रकरणात बनावट कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी फ्लेचर पटेल (Fletcher Patel) आणि NCB अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांचे काय कनेक्शन असा सवाल उपस्थित केला होता. याला आता फ्लेचर पटेल (Fletcher Patel ) यांनी उत्तर दिले आहे. मी माझे काम करीत आहे. मी सैन्यात होतो. मी देशसेवा केली आहे. ड्रग्जविरोधात लढ देत आहे. नवाब मलिक यांना ओळखत नाही, त्यांना का उत्तर देऊ, असा प्रति सवाल फ्लेचर पटेल यांनी केला.

समीर वानखेडे - फ्लेचर काय कनेक्शन, ती लेडी डॉन कोण? - मलिक  

फ्लेचर पटेल म्हणाले, मी सैन्यात होतो. 15 वर्षे देशाला आपली सेवा दिली आहे. मी टॅंक विभागात होतो. नवाब मलिक यांनी माझ्यावर लावलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. मला अभिमान आहे की, मी भारतीय सेनेचा आहे. निवृत्त झाल्यानंतरही माझी सेवा संपलेली नाही.

ते पुढे म्हणाले, मी समीर वानखेडे यांची बहीण जमसीन वानखेडे यांना माझी मानलेली बहीण मानतो. ती स्वतः क्राईम वकील आहेत. चांगले काम केले जात आहे. ते (नवाब मलिक) त्यांना दिसत नाही. ते केवळ आरोप करत आहेत. निवृत्त झाल्यानंतरही मी ड्रग्जविरोधातील लढा लढत आहे. आमच्या माजी सैनिकांच्या संघटनेने समीर वानखेडे यांचा सन्मान केला होता. माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत, ते मला मान्य नाहीत. असे असूनही, मी ही लढाई NCB सोबत लढत राहीन. नवाब मलिक कोण आहेत, हे मला माहित नाही आणि मी त्यांचे का ऐकावे, असा सवाल फ्लेचर पटेल यांनी उपस्थित केला.

दरम्यान, Drugs case : ड्रग्ज प्रकरणी जी कारवाई करण्यात येत आहे ती ठरवून केली जात आहे. NCB ठरवून खोट्या केसेस करत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई ही बनावट होती, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. याबाबत वानखेडे यांनी करण्यात आलेल्या पंचनाम्याची माहिती द्यावी, असे प्रति आव्हान मलिक यांनी दिले. तसेच NCBने फ्लेचर पटेलसोबत लेडी डॉन कोण आहे, याचा खुलासाही त्यांनी करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. एनसीबीचे अधिकारी वानखेडे आणि फ्लेचर पटेल यांचे काय संबंध आहेत, ते त्यांनी सांगावे. मलिक यांनी ट्विट करतना फ्लेचर पटेल आणि वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच फ्लेचर पटेलसोबत लेडी डॉन कोण आहे, अशी विचारना मलिक यांनी केली आहे. मलिक यांनी पत्रकार परिषद घेत NCBबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.