Floor Test: राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना बहुमत चाचणीत नाही घेता येणार सहभाग

राष्ट्रवादीला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 29, 2022, 11:18 AM IST
Floor Test: राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना बहुमत चाचणीत नाही घेता येणार सहभाग title=

मुंबई : महाराष्ट्रात फ्लोर टेस्टपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे चार आमदार फ्लोर टेस्टमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. ज्यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे.

अजित पवार आणि छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यामुळे या चार नेत्यांना विश्वासदर्शक ठरावात भाग घेता येण्याची शक्यता कमीच आहे.

राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीतही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना कोर्टाकडून मतदानाची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आताही त्यांना परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

दुसरीकडे अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ते क्वारंटाईन आहेत. त्यामुळे जर उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला गेला तर ते देखील मतदानाला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे.