विविधरंगी फुलांनी फुलली राणीची बाग

मुंबईच्या भायखळा इथली राणीची बाग विविधरंगी फुलांनी फुलून गेलीय. त्यामुळे फुलांच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 9, 2018, 06:27 PM IST
विविधरंगी फुलांनी फुलली राणीची बाग

मुंबई : मुंबईच्या भायखळा इथली राणीची बाग विविधरंगी फुलांनी फुलून गेलीय. त्यामुळे फुलांच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे.

या उद्यान प्रदर्शनात शेकडो फुलांच्या, झाडांच्या, वेलींच्या प्रजाती पाहण्याचा मनमोहक योग मुंबईकरांसाठी जुळून आलाय. त्यामुळं मुंबईकरांचा विकेंड निसर्गाच्या सानिध्यात उत्साहवर्धक वातावरणात जाणार आहेय. रविवारी रात्रीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.