मुंबई : रााज्यात आज 105 नगरपंचायतीसाठी आणि 2 जिल्हा परिषदांसाठी मतदान सुरू, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.... नव वर्षात डाळ, तांदुळ, खाद्यतेल स्वस्त होणार?.... नव्या वर्षात डेबिट कार्डचे नियम बदलणार... शिवाय ओमायक्रॉमबद्दल महत्त्वाची माहिती आजच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये...
1. राज्यात आज 105 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांसाठी मतदान सुरू, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेसाठीही आज मतदान होणार आहे. रोहित पवार, रोहित पाटील, यशोमती ठाकूर, भारती पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
2. राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या 544 नव्या रुग्णांची नोंद जालीये. तसंच कोरोनामुळे राज्यात चौघांचा मृत्यू झालाय..काल दिसभरात 515 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. राज्यात गेल्या 24 तासांत मुंबई येथे 191, ठाणे जिल्हा 85, नाशिक जिल्हा 34, अहमदनगर जिल्हा 54, पुणे जिल्हा 93 नव्या रुग्णांची नोंद झाली.
3. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी मुलांमध्येही लसीकरण करण्याची मागणी सातत्याने वाढतेय. मात्र महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये दोन ते सतरा वयोगटातील मुलांसाठी सुरू असलेल्या ट्रायल्समध्ये केवळ 40 मुलांनी सहभाग नोंदवलाय. ही संख्या अपुरी असल्यामुळे मुलांच्या लसीकरणाबाबत साशंकता निर्माण झालीये.
4. भारतात ओमायक्रॉनची घातकता अद्यापही स्पष्ट झालेली नाहीये.. या व्हेरियंटची मानवी प्रतिकारशक्तिला चकवा देण्याची क्षमतेबाबत स्पष्ट पुरावा मिळाला नसल्याचं इन्साकॉगनं अहवालात म्हटलंय. मात्र हा नवा व्हेरियंट जगभरात वेगानं पसरत असल्याचंही इन्साकॉगनं मान्य केलंय.
5. भाववाढीच्या काळात थोडा दिलासा देणारी बातमी..... डाळ, तांदुळ, खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरांत 15 टक्के घट होण्याची शक्यता आहे. वर्षभराच्या बंदीनं भाव घटण्याचा व्यापाऱ्यांना विश्वास आहे.
6. नव्या वर्षात डेबिट कार्डचे नियम बदलणार आहेत. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सुरक्षेसाठी ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करताना कार्डवरील 16 डिजिटसह संपूर्ण माहिती द्यावी लागेल किंवा टोकनायझेशनचा पर्याय निवडून पेमेंट करावं लागणार आहे. ऑनलाईन फसवणू टाळण्यासाठी आरबीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
7. मुंबईत सीएनजीचे भाव वाढल्याने रिक्षा-टॅक्सी चालक नाराज आहेत. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ करण्याची मागणी चालकांनी केली आहे. टॅक्सी दरात पाच रूपये वाढ तर, रिक्षाचं किमान भाडं 25 रूपये करण्याची मुंबई-टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
8. ईडी चौकशीनंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सकाळी मुंबईत दाखल झाली.. पनामा पेपर लीक प्रकरणी दिल्लीत ईडीकडून ऐश्वर्या रायची तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली.. टॅक्समध्ये हेराफेरी केल्याचा ऐश्वर्या रायवर आरोप ठेवण्यात आलाय.