#METOO : पोलीस दलालाही विळखा

 पोलीस दलालाही मीटूचा विळखा बसल्याचं स्पष्ट झालंय.

Updated: Oct 11, 2018, 07:27 PM IST
#METOO : पोलीस दलालाही विळखा

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलालाही मीटूचा विळखा बसल्याचं स्पष्ट झालंय. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एक ज्येष्ठ पुढाऱ्याने एका महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्या कॉन्स्टेबलनं आत्महत्या केली. मात्र हे प्रकरण कधीच उजेडात आलं नाही, असा गौप्यस्फोट माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी केलाय.

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही गंभीर टिप्पणी केली. नाना-तनुश्री प्रकरणात जे सत्य आहे, अखेर त्याचाच विजय होईल, असं सुराडकर म्हणाले.