मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) फरार घोषित करण्यात आले आहेत.

Updated: Nov 17, 2021, 06:11 PM IST
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित title=

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) फरार घोषित करण्यात आले आहेत. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेतर्फे अर्ज़ाला मंजूरी देण्यात आली. गोरेगाव वसूली गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने न्यायालयाकडे अर्ज केला होता. 

30 दिवसाच्या आत परमबीर सिंग हे हजर न झाल्यास त्यांची संपती जप्त केली जाणार आहे. प्रकरणात परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंह हे तिन्ही फरार घोषित करण्यात आले आहेत.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपाच्या तपासात त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र वारंवार फोन करूनही तो आला नाही.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यावर 26 ऑक्टोबर ही तारीख नोंदवली असून, त्यात ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ठाणे पोलिसांना परमबीर सिंगला अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितले आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्राची CID आणि NIA परमबीर सिंग यांचा शोधत आहे, पण परमबीर बेपत्ता आहे.

27 सप्टेंबर रोजी ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

परमबीर सिंग हे रजेवर गेल्याच्या दिवसापासून म्हणजेच 5 मे रोजी त्याच्यावर तीन व्यावसायिकांकडून कोट्यवधींची खंडणी घेतल्याचा आरोप होता. 22 जुलै रोजी परमबीर सिंग यांच्यावर 15 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 30 जुलै रोजी खंडणी व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 20 ऑगस्ट रोजी वसुलीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. 27 सप्टेंबर रोजी ठाण्यातही खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.