Gold Rate today | सुवर्ण झळाळी वाढली; आजचे भाव किती जाणून घ्या

Gold rate today in mumbai रशिया आणि यूक्रेन यांच्यात वाढत्या तणावामुळे सोन्याच्या सोन्याच्या भावाला झळाळी मिळाली आहे.  साधारण 13 महिन्यांनंतर वायदे बाजारात पुन्हा सोन्याचे भाव 50 हजार प्रति तोळेवर जाऊन पोचले आहेत. 

Updated: Feb 15, 2022, 10:13 AM IST
Gold Rate today | सुवर्ण झळाळी वाढली; आजचे भाव किती जाणून घ्या title=

मुंबई : रशिया आणि यूक्रेन यांच्यात वाढत्या तणावामुळे सोन्याच्या सोन्याच्या भावाला झळाळी मिळाली आहे.  साधारण 13 महिन्यांनंतर वायदे बाजारात पुन्हा सोन्याचे भाव 50 हजार प्रति तोळेवर जाऊन पोचले आहेत. 

जगभरातील गुंतवणूकदार अस्थिर परिस्थितीत शेअर बाजार किंवा इतर जोखमीच्या गुंतवणुकीतून पैसे सुरक्षित गुंतवणूक तिकडे वळतात. याच प्रक्रियेचा भाग म्हणून रशिया युक्रेन यांच्यातील युद्धसदृश परिस्थिती मुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतल्याचं चित्र सध्या निर्माण झाला आहे.

गेलं वर्षभर सोन्यातील गुंतवणूकीने गुंतवणूकदारांना फारसा परतावा दिला नाही. या पार्श्वभूमीवर आज वायदा बाजारात सोन्याच्या भावात झालेली तीनशे रुपयांची वाढ सोन्याला पन्नास हजाराच्या वर घेऊन गेली आहे. 

मुंबईतील आजचे सोन्याचे भाव

24 कॅरेट 51,060 रुपये प्रति तोळे
22 कॅरेट 51,060 रुपये प्रति तोळे

चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात उठाव बघायला मिळतोय एक किलो चांदी साठी आज वायदा बाजारात हजार रुपये मोजावे लागतात. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुद्धा सोने चांदीच्या भावात वाढ बघायला मिळते आहे.