मुंबई : एस.टी. महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या लिपिक-टंकलेखक पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एस.टी. च्या वाहकांना काही अटींची पूर्तता करून अर्ज भरण्याची संधी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री आणि मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.
गणपती उत्सवाच्या पूर्वसंध्येला एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ एसटीतील पदवीधर हजारो वाहकांना विशेषत: महिला वाहकांवा होणार आहे. कर्मचारी वर्गाकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. एसटी मंडळाकडबन ५ जानेवारी २०१७ मध्ये सुमारे १४ हजार पदांची भरतीप्रक्रिया रावबिण्यास सुरूवात केली. त्यामध्ये सुमारे २२०० लिपिक-टंकलेखक पदाकरिता आवेदनपत्र मागविण्यात आले. आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या पात्र वाहकांना या परिक्षेच्या माध्यमातून लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नत होण्याची संधी मिळणार आहे.
त्यानुसार एसटी प्रशासनाने सुधारित परिपत्रक निर्गमित केले असून एसटीतील पात्र वाहकांना लिपिक-टंकलेखक पदासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. १३ सप्टेंबर २०१७ पर्यंत अर्ज सादर करावेत असे सांगण्यात आले आहेत. या उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे.