आणखी एक सदस्य निलंबित करण्याचा सरकाराचा डाव, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नितेश राणे यांच्या निलंबणाची भास्कर जाधव यांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांचा संताप

Updated: Dec 27, 2021, 02:13 PM IST
आणखी एक सदस्य निलंबित करण्याचा सरकाराचा डाव, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप title=

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नितेस राणे यांच्या त्या कृत्यावर आक्षेप घेत नितेश राणे याचं निलंबन करावं अशी मागणी केली. 

सभागृहात भास्कर जाधव आक्रमक
सभागृहात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आक्रमक भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बोललं पाहिजे होतं, की तुम्ही असं म्हणता कामा नये, तर या सदस्यांची पुन्हा हिम्मत झाली नसती, कुणाची नक्कल करायची, सदस्यांची हिम्मत का झाली कुणाची टिंगल टवाळी करण्याची, मला माफी मागायला लावलीत. आणि आता फक्त झालं ते झालं म्हणता, कसं शक्य आहे हे. त्यामुळे त्या सदस्याचं निलंबन करा, किंवा सभागृहात हात जोडून माफी मागा, ही आमची मागणी आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
भास्कर जाधव यांनी केलेल्या मागणाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांच्या केलेल्या अपमानाची आठवण करुन दिली

या सभागृहात नवा पायंडा सुरु झाला आहे, विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांकडे पाहायचं नाही, विरोधी पक्षाची अवश्यकता नाही का? हे सर्व ठरवून सुरु आहे आधी 12 आमदार निलंबित केले, आता आणखी एक आमदार निलंबित करायचा, आम्ही लोकशाहीत लढणारे लोकं आहोत, रडणारे नाही, 

नितेश राणे यांच्यासंदर्भात जो काही विषय उपस्थित झाला, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली, कोणत्याही पक्षाच्या सदस्याने असं वागू नये, पण भास्कर जाधव यांनी विषय काढला म्हणून आम्ही आठवण करुन देतो, याच सभागृहात छगन भुजबळ यांना हुप हुप करुन डिवचण्यात भास्कर जाधवही होते, पण आम्ही त्याचंही समर्थन करत नाही. आता या सभागृहाबाहेर जी काही गोष्ट घडली त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण हे जर ठरवून आले असतील की त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्या सदस्याला निलंबित करायचं, तर हे लोकशाहीत योग्य नाही. 

नितेश राणे यांच्या माधयमातून विरोधकांचा एक सदस्य निलंबित करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.