मुंबई : भाजप आमदार निलेश राणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मंत्री अदित्य ठाकरे यांच्याकडे पाहत 'म्याव म्याव' आवाज काढला होता. त्यावरून सेना आमदार सुहास कांदे यांनी म्हटले की, आमच्या नेत्याबद्दल वाईट बोललं तर ते खपवून घेतले जाणार नाही. शिवसेना प्रमुखांचे वंशजही आमच्यासाठी दैवत आहेत. आमच्या नेत्याबद्दल वाईट बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही.
नितेश राणे यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना निलंबित करावे अशी मागणी कांदे यांनी केली. नितेश राणे यांनी माफी मागावी यासाठी सेना आमदार भास्कर जाधव देखील आक्रमक झाले होते.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्या म्याव म्याव या प्रकाराला शिवसैनिकांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाबा मला वाचवा, कॉक कॉक कॉक कॉक अशा घोषणा देत नितेश राणे यांची खिल्ली उडवली आहे.
---
भाजप आमदार नितेश राणेंना अटक होणार? राणे वि. शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. परब यांच्यवरील हल्ल्याचे सुत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे राणे यांना अटक करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
नितेश राणेंवर सुडाच्या भावनेतून आरोप होत असून, जिल्हा बँकेत पराभव दिसत असल्याने सत्ताधा-यांकडून हे सगळे होत असल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलाय.