close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Happy Birthday : राज ठाकरेंबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या  वाढदिवस आज साजरा करण्यात आलाय. राज यांच्या चाहत्यांना त्यांच्याबाबत या काही गोष्टी माहित आहेत का? राज ठाकरेंची मूळ नाव काय, याबाबत फारसे कोणाला माहिती नाही.

Updated: Jun 14, 2018, 06:29 PM IST
Happy Birthday : राज ठाकरेंबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या  वाढदिवस आज साजरा करण्यात आलाय. या निमित्ताने वेगळा विदर्भची मागणी करणाऱ्या माजी अभिवक्ता श्रीहरी अणे यांच्या फोटोचा केक  कापून यावेळी निषेध करण्यात आला. दरम्यान, आज राज यांच्या वाढदिवसानिमित्ताने महागाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. पेट्रोलचे भाव शंभरीकडे जात असल्याने मनसेने चक्क ४ रुपयांनी पेट्रोल विक्री करत अनोखा निषेध व्यक्त केला. आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना आणि राज यांच्या चाहत्यांना त्यांच्याबाबत या काही गोष्टी माहित आहेत का? राज ठाकरेंची मूळ नाव काय, याबाबत फारसे कोणाला माहिती नाही.

राज ठाकरेंची लोकप्रियता कायम

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलचे आकर्षण कमी झालेले नाही. आजही तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे. १४ जून रोजी राज ठाकरेंनी वयाच्या पन्नाशीमध्ये पदार्पण केले आहे. त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेण्याचा हा प्रयत्न. ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश संपादन केले. पहिल्याच प्रयत्नात १३ आमदार निवडणून आले. तर त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत चांगले मताधिक्क घेतले. मुंबईत काही ठिकाणी दोन क्रमांकावर मनसेचे उमेदवार राहिलेत. त्यामुळे राज ठाकरे यांची जादु दिसून आली. मात्र,  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकत मोठया प्रमाणात घटली आहे. तेरावरुन एक आमदार आणि मुंबई महापालिकेत एक नगरसेवक अशी मनसेची घसरण झाली आहे. मागच्या काहीवर्षात अनेक महत्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्षाची ताकत कमी झाली. पण असे असूनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलचे आकर्षण कमी झालेले नाही.  

राज ठाकरे यांचे खरे नाव

राज ठाकरे यांचे मूळ नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे आहे. त्यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. राज यांचे संपूर्ण शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले.त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हे सख्खे भाऊ. संगीत क्षेत्राची आवड असलेल्या श्रीकांत ठाकरे संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. तसेच व्यंगचित्रांबरोबर राज ठाकरेंना तबला, गिटार आणि व्हायोलिनही वाजवता येते. बालपणी त्यांनी ही वाद्य वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले. राज ठाकरे आज राजकारणी असले तरी मूळचे ते व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्राचा हा वारसा त्यांना काका बाळासाहेब ठाकरेंकडून मिळाला आहे. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मार्मिक नियतकालिक आणि सामना या वर्तमानपत्रासाठी व्यंगचित्रे काढली. आता ते फेसबूकवर जोरदार फटकेबाजी करत आहेत.

राज ठाकरेंच्या कुटुंबीयांबाबत

 राज ठाकरे यांची आई कुंदा ठाकरे आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्वर्गीय मिनाताई ठाकरे या सख्ख्या बहिणी आहेत. राज ठाकरे यांचा शर्मिला वाघ  यांच्यासोबत विवाह झाला. त्या प्रसिद्ध नाटय निर्माते मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज आणि शर्मिला ठाकरे यांना दोन मुले आहेत. अमित आणि उर्वशी. उर्वशी या फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करीयर करत आहेत. तर अमितचा साखरपुडा झाला असून राज यांच्या होणाऱ्या सूनबाई मिताली बोरुडे या सुद्धा फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आहेत.

राज ठाकरेंची आवड

व्यंगचित्र, राजकारणाबरोबर राज ठाकरेंना चित्रपट आणि फोटोग्राफी या क्षेत्राचीही विशेष आवड आहे. राज यांना चित्रपट पाहायला आवडतात. मराठी चित्रपट सृष्टीबरोबर बॉलिवूडमध्येही त्यांचे उत्तम संबंध आहे. राज ठाकरेंच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. काका आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत:बरोबर त्यांना सभेसाठी घेऊन जायचे.

जय महाराष्ट्र करत मनसेची स्थापना

२००६ मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.  २००८ मध्ये मराठीचा मुद्दा उचलून धरल्यानंतर त्यांना मोठया प्रमाणावर जनसमर्थन मिळाले. २००९ च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे तेरा आमदार निवडून आले.