close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विकास आराखडा मराठीत हवा - शिवसेना

विकास आराखडा मराठी भाषेतच देण्याची मागणी करा आशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नगरसेवकांना दिल्यात. उद्धव ठाकरेंनी शिवसेना नगरसेवकांसोबत बैठक घेतली. 

Updated: Jun 14, 2018, 06:16 PM IST
विकास आराखडा मराठीत हवा - शिवसेना

मुंबई : विकास आराखडा मराठी भाषेतच देण्याची मागणी करा आशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नगरसेवकांना दिल्यात. उद्धव ठाकरेंनी शिवसेना नगरसेवकांसोबत बैठक घेतली या बैठकीत त्यांनी नगरसेवकांना अनेक महत्त्वाच्या सूचना केल्यात.. काही विकासक आपल्या प्रकल्पांच्या जाहिरातीत मुंबईतील जागांची नावं मुद्दाम बदलत आहेत अशा विकासकांची माहिती महापालिका प्रशासनाला द्या. विकासक ऐकत नसेल तर प्रसंगी विकासकांना शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्या असे आदेश त्यांनी नगरसेवकांना दिलेत. शिवाय विभागातील मुंबई पदवीधर मतदार संघ आणि मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणुकीतील मतदारांच्या याद्या करा त्यांच्याशी चांगला संपर्क आणि संवाद ठेवण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना केल्यात.